Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : देशामधील ओबीसीचे आरक्षण संपुष्ठात आल्याने ओबीसींना त्यांच्या आरक्षणाचा हक्क पुन्हा मिळावा यासाठी नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी सकाळी नेरूळमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या निषेधात घोषणा देत कॉंग्रेसने छत्रपती शाहू महाराजांच्या जंयतीदिनाचा म्हणजेच सामाजिक न्याय दिनाचा मुहूर्त निवडला.
नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नेरूळ सेक्टर २ मध्ये रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचे पापही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारचे पाप असल्याचा आरोप यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी निदर्शनादरम्यान केला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे ओबीसींची आकडेवारी मागितली होती. परंतु त्यांनी ती न दिल्यामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. यामुळेच आज ओबीसींच्या न्याय हक्कासाठी कॉंग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली.
यावेळी आंदोलनात रवींद्र सावंत यांच्यासोबत माजी उपमहापौर अविनाश लाड, कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर, माजी नगरसेवक एकनाथ तांडेल, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव विजय कुरकुटे, तालुका उपाध्यक्ष दिनेश गवळी, शेवंता मोरे, प्रल्हाद गायकवाड, सुधीर पांचाळ, माने, देसाई, प्रभाग ८५चे कॉंग्रेसचे वार्ड अध्यक्ष हितेश तांबे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.