Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : डासांच्या वाढत्या उद्रेकामुळे रहीवाशांचे साथीच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर २,४ तसेच जुईनगर सेक्टर २४,२५ या ठिकाणी धुरीकरण करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई युवती अध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू यांनी शनिवारी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळ्यात डासांची प्रजननक्षमता वाढीस लागते, त्यातच नेरूळ सेक्टर २,४ आणि जुईनगर सेक्टर २४,२५ हा परिसर खाडीकिनारीच असल्याने येथील रहीवाशांना साथीच्या आजाराचा दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असतो. आधीच कोरोनाने स्थानिक रहीवाशी हतबल झाले असून डासांच्या त्रासामुळे त्यांना ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये यामुळे डास नियत्रंणासाठी आम्ही महापालिका प्रशासनाकडे प्रभाग ८४ मध्ये धुरीकरण करण्याची मागणी केली असल्याची माहिती सौ. सुहासिनी नायडू यांनी यावेळी दिली.