संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी जनसेवक गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये सेक्टर १६ परिसरात सनहोम या गृहनिर्माण सोसायटीलगत आणि सनशाईन हॉस्पिटललगत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात स्वच्छतेचा अभाव असून बकालपणा वाढीस लागला आहे. उपकेंद्राचे लोखंडी दरवाजे तुटले असून उपकेंद्राच्या बांधकामाचीही पडझड झालेली आहे. बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर आहे. उपकेंद्राच्या सभोवताली जंगली झुडुपे वाढली आहेत. या ठिकाणी रहीवाशांना साप, नागाचे दर्शनही अनेकदा झालेले आहे. उपकेंद्राच्या बकालपणामुळे डासांचा उद्रेक वाढला असून रहीवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. उपकेंद्राच्या दरवाजा दुरूस्तीचे, बांधकामाच्या डागडूजीचे तसेच जंगली झुडुपे तोडण्याचे व बकालपणा हटविण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.