संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना मयत मदतनिधी देताना महिला व पुरूष असा भेदभाव न करण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर याच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून कोरोनाने मयत झालेल्या परिवारांसाठी विविध योजना जाहिर करताना आपला लोककल्याणकारी हेतू आपण स्पष्ट केलेला आहे, आपल्या हेतू व भूमिकेबाबत सर्वप्रथम आपले अभिनंदन व यापुढेही नवी मुंबईकरांच्या हितासाठी आपण असेच निर्णय घ्याल याची आम्हाला खात्री आहे. कोरोनामध्ये घरातील पुरूषाचे निधन झाल्यास संबंधित विधवा महिलांना महापालिकेकडून दीड लाख रूपयाची मदत देण्यात येणार आहे. वास्तविक पाहता महिला-पुरूष आजच्या काळात महागाईचा सामना करताना प्रत्येकजण घराचा आर्थिक हातभार उचलत असतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोनाग्रस्त परिवारांना मदत करताना महिला व पुरूष असा भेदभाव न करता कोरोनामुळे घरातील महिलांचेही निधन झाल्यास प्रशासनाने त्या मयत महिलेच्या यजमानांनाही मदत करावी. कारण घरातील कर्ता पुरूष असो वा महिला . कोणाचेही निधन झाल्यास घरातल्यांना मानसिक व आर्थिक धक्का बसतो. त्यामुळे कोरोनाग्रस्त महिलांचेही निधन झाल्यास पालिका प्रशासनाने संबंधित पुरूषांनाही दीड लाख रूपयांची आर्थिक मदत करावी व सुधारीत निर्णय प्रसिध्द करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.