संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असतानाच गुरूवारी (दि. १ जुलै ) नवी मुंबईत कोरोनाचे १४४ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ४८९ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ४३३ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १४४ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ३५ रूग्ण, नेरूळ विभागात १६ रूग्ण, वाशी विभागात २४ रूग्ण, तुर्भे विभागात २० रूग्ण, कोपरखैराणे विभागात २४ रूग्ण, घणसोली विभागात १७ रूग्ण, ऐरोली विभागात ०८ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात आज कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. कोरोना आजारातून बरे झालेल्या ८२ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.