संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ परिसरात गेल्या काही दिवसात घरफोडीच्या तसेच चेन स्नॅचिंगच्या घटना होवू लागल्या आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक सदनिका आजही बंद आहेत. चेन स्नॅचिंगच्या तसेच घरफोडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी आपण त्या परिसरात पोलीस गस्त वाढविण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवून करावयाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. पोलीस गस्त वाढल्यास चेन स्नॅचिंग तसेच घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांचा धाक वाटेल व या घटना संपुष्ठात येतील. लवकरात लवकर परिसरात गस्त वाढविण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत व स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी केली आहे.
विभागात गर्दुले, नशापाणी करणारे तसेच चरसी लोकांचाही खुलेआम वावर वाढू लागल्याने परिसरात वावरणे सर्वसामान्यांना अवघड होवून बसले असल्याची भीती गणेश भगत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.