संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : शिववाहतुक सेवेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले यांच्यामुळे रिक्षा चालकांची अतिरिक्त दंडातून सुटका झाली असून परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान दिलीप आमले यांनी रिक्षा चालकांच्या समस्या मांडल्या.
रिक्षा चालकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दिलीप आमले यांच्या पुढाकारातून नवी मुंबईतील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. हेमागिनी पाटील यांची व रिक्षा युनियनचे पदाधिकारी यांची आरटीओ कार्यालयात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत हेमागिनी पाटील यांनी रिक्षाचालकांच्या सर्व अडचणी प्रथम जाणून घेतल्या व लगेचच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या., परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्याबरोबर दिलीप आमलेंसमवेतच्या शिष्टमंडळाने रिक्षा चालकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून लेट परमीट दंड कमी करणार करण्याचे आश्वासन मिळविले.
चर्चेदरम्यान रिक्षा पासिंग संख्या वाढविणे व लगेच १५ रिक्षा वाढवून मिळाला व कोटाही खुला करण्यात आला. शासकीय अनुदानाबाबतीत १५०० रूपये सोबत अल्पमदतीचे फार्म रिजेक्ट करणार नाहीत, जर झाले तरी पुन्हा भरून द्यावा असे नवी मुंबई परिवहन अधिकारी सौ हेमागिनी पाटील यांनी सांगितले. वरील सर्व समस्या धनंजय पाटील यांच्यासह हजारो रिक्षा चालकांनी दिलीप आमले यांच्याकडे व त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे मांडल्याने रिक्षाचालकांना दिलासा मिळाला. या बैठकीत दिलिप किसनराव आमले यांच्यासह सुरेश काळे अध्यक्ष – नवी मुंबई रिक्षा चालक मालक सघटना वाशी, श्री भाऊसाहेब पाटील सदस्य : शिवसेना शिव वाहतूकसेवा. श्री.लंगोटे, राजेश शिंदे यांच्या सह युनियन पदाधिकारी सदस्य बैठकीत उपस्थित होते. नवी मुंबई मधील सर्वच रिक्षा चालकांच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. हेमागिनी पाटील यांचे दिलीप आमले यांनी मनापासून आभार व्यक्त केले.