
संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
⏰नवी मुंबई : कोरोना सारख्या महामारीच्या संकटात, लॉकडाऊन आणि बेरोजगारी यांनी त्रस्त असलेल्या जनतेच्या त्रासात अजून भर पडावी म्हणून केंद्र सरकार दिवसेंदिवस (दररोज) दरवाढ करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी असताना पेट्रोल डिझेल, गॅस, खाद्यतेल या मध्ये करण्यात येणाऱ्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नवी मुंबईच्या वतीने नवी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
यावेळी नवी मुंबई मधील सर्व तालुक्यांत सी. बी. डी. (बेलापूर), नेरुळ सीवूड (पश्चिम), नेरुळ सीवूड (पूर्व), सानपाडा – जुईनगर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या सर्व तालुक्यांत निषेध आंदोलन करण्यात आले व या आंदोलनात सर्व तालुका अध्यक्ष, महिला तालुका अध्यक्षा, युवक, युवती तालुका अध्यक्ष, व सर्व फ्रंट सेलचे पदाधिकारी उपस्थित राहून तालुकानिहाय आंदोलनात सहभागी होवून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
तसेच वाशी मध्यवर्ती कार्यालय येथील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकार सामान्य जनतेची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे हे जनतेला व प्रशासनास दाखवून देण्यासाठी रविवारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करुन तीव्र निषेध करण्यात आला
या आंदोलनामध्ये नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, नवी मुंबई कार्याध्यक्ष जी एस पाटील, प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भोजमल पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ प्राजक्ता मोंडकर, संतोष खंबाळकर, कार्याध्यक्षा सौ. सुनिता देशमुख, उपाध्यक्षा सौ. उज्वला ढोले, कैलास माने, किशोर (अन्नू) आंग्रे, अशोक शिनगारे, माजी नगरसेवक राजू शिंदे, वैभव गायकवाड, अनिल घोगरे, अशोक सुर्यवंशी, प्रविण लोकरे, सतनाम नागपाल, विकास गाढवे, सौ नंदा डेरे, संतोष ठाकूर, सौ. विद्या खंबाळकर, सौ. सुमित्रा पवार, राजू देशमुख, सौ निर्मला वायकर, सौ निर्मला लंटाबळे, सौ गौरीताई आंग्रे, सुशिल हांडे, रवि ढोबळे, अजय सुपेकर, विश्वास बोऱ्हाडे, महादेव पवार, राहुल म्हात्रे, सौ. संगिता बोऱ्हाडे, सौ. सीमा पाटील, सौ. विजया कदम, सौ. सुनिता हुले, सौ. आशा डुमरे, पोपट गोरडे, सौ. दिव्या मोरे, सौ. कुसुम कांबळे, सौ. माधुरी वाघ, व इतर सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.