संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com- ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३
पनवेल : पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीमध्ये पनवेल महानगरपालीकेला पाणी पुरवठा करणारे देहरंग धरण आहे. सदर परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरायला येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांच्यापासून स्थानिक नागरिकांना संसर्गाचा धोका निर्माण होवू शकतो. तसेच पर्यटक कोरोनाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे देहरंग धरणाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वास पाटील आणि उपतालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर यांनी तालुका पोलिसांकडे केली आहे.
काही पर्यटक मद्यप्राशन करून चारचाकी वाहनातील म्युझिक सिस्टीम चालु करूज बेधुंदपणे गाण्यावर नाचत असतात व मदयप्राशन करून बेजबाबदारपणे वाहने चालवतात. त्यामुळे या परिसरात बरेचसे अपघात घडतात. धरण परिसरात बरेचसे फार्म हाऊस अहेत. ते रात्री अपरात्री मद्यप्राशन करून गाण्याच्या आवाजावर जोरजोरात नाचणे चालू असते. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही अविवाहीत प्रेमीयुगल रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत फिरत असतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडु शकतात. धरण आणि धरणाच्या परिसरातील नद्यांमध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बऱ्याच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वास पाटील आणि उपतालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर यांनी केली आहे.