संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
पालकांच्या अव्वाच्या सव्वा फीमध्ये सवलतीची केली मागणी
मुजोर शाळा प्रशासनाने चर्चेला बोलावून भेट नाकारली
पोलिसांना पाचारण करून शाळा प्रशासनाने पत्रकारांना हुसकावण्याचा केला प्रयत्न
पनवेल : सध्या कोरोना महामारीने सर्व जगाचेच अर्थकारण हतबल झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना रोजगार असले तर पगार कमी येत आहेत. त्यातच घर चालविणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील डीएव्ही शाळेत फीवरून पालक व शालेय व्यवस्थापनात सुसंवादाचा अभाव आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर डीएव्ही शाळेने विद्यार्थ्यांकडे फी साठी तगादा लावला, याचा जाब विचारण्यासाठी एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी आणि याबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला बोलावून भेट नाकारल्यामुळे एमआयएमचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. यावेळी आपण शांततेच्या मार्गाने भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आलो होतो, मात्र चर्चेला बोलावून भेट नाकारणाऱ्या शाळा प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पैशाअभावी कोरोना महामारीत पालक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय फीबाबत चर्चेसाठी पालकांनी शालेय व्यवस्थापणाला अनेक मेल करून तसेच निवेदन देवूनही शालेय व्यवस्थापण बैठक आयोजित करत नाही. पालकांना कोणताही प्रतिसाद देत नाही. एमआयएम विद्यार्थी आघाडी पालकांसमवेत आपले शिष्टमंडळ सोमवारी, दि. ५ जुलै रोजी शाळेत जाणार आहे. पालक व शाळेमध्ये सुसंवाद यावा, समस्यांवर तोडगा निघावा ही एमआयएमची भूमिका आहे. यावेळी होणाऱ्या चर्चेच्या वेळी स्थानिक महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारीही तेथे उपलब्ध होणे गरजेचे असतानाही याठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाहीत. पालिका प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी याठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे होते, मात्र पत्रकारांची गर्दी पाहिल्यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. यावेळी शाळा प्रशासनाचा पत्रकारांना हुसकाविण्याचा डाव मात्र फसला.
डीएव्ही शाळेचे पालक पनवेल महानगरपालिकेचे करदाते आहेत. त्यांनी भरलेल्या करामुळे पालिका प्रशासनाला कारभार करणे शक्य होत आहे. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महापालिकेचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत एमआयएम कडून सांगण्यात आले होते. मात्र महापालिका प्रशासनाने याबाबतची गंभीर दखल न घेतल्यामुळे पालकांमध्येही संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी चर्चेसाठी एमआयएमचे विद्यार्थी संगटनेचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान, महाराष्ट्र प्रवक्ता रविश मोमीन, रोशन शेख, विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष वैभव महाडिक, सरस्वती मेमाणे, योगेश पवार, हेमांगी चोपडे आदींसह पालक उपस्थित होते. यावेळी शांतपणे चर्चा प्रथम बोलाविले, आणि आल्यानंतर भेट नाकारली, ही बाब खेदजनक असून याची दखल कायदेशीर मार्गाने घ्यायला भाग पडणार, तसेच आज शांतपणे आलेले पालक उद्या विराट मोर्चा घेऊन येतील असा इशाराही यावेळी एमआयएमच्यावतीने देण्यात आला.