संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई ते विधानभवन असा मोर्चा काढला
मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि इतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वाशी पोलिसांकडून अटक
नवी मुंबई : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निलच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. २०१९ आणि २०२० मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊनही भरती प्रक्रिया सुरु झाल्याने स्वप्निल हताश होता. गरीब वडिलांनी सावकारी कर्ज काढून शिकवल्याने स्वप्निल कर्ज कसे फिटेल या विवंचनेत होता. यातून निराश होऊन स्वप्निल लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिरंगाईमुळेच स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने मनसेचे संवेदनशील नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारविरुद्ध आज मनसेने नवी मुंबईतून आंदोलनाची हाक दिली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी नवी मुंबई ते वाशी असा मोर्चा काढला.
सकाळी ७ वाजता वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. परंतु वाशी पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडवला. स्वप्निलला न्याय मिळालाच पाहिजे, सरकारवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे , या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय, अशा घोषणा देऊन महाराष्ट्र सैनिकांनी वाशी परिसर दणाणून सोडला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
आत्महत्या होऊन अनेक दिवस झाले तरीही मुर्दाड सरकारला जाग येत नाही. स्वप्निल सारख्या हजारो-लाखो तरुण आज नैराश्येत आहेत. केवळ सरकारच्या दिरंगाईमुळे हे झाल्याने सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली. सरकारमधील आदित्य ठाकरे, रोहित पवार हे युवा नेते का शांत आहेत असाही सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला. मनसेच्या आंदोलनात उप शहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, शहर सह सचिव अभिजीत देसाई, शरद दिघे, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष नितीन खानविलकर, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक किरण सावंत, शारीरिक सेना शहर संघटक सागर नाईकरे , महिला सेना उप शहर अध्यक्ष अनिता नायडू, दीपाली धऊल , विभागअध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, अशोक भोसले, अमोल आयवळे, भूषण कोळी, उमेश गायकवाड, चंद्रकांत मंजुळकर आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या दोन दिवसात अधिवेशनात सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर मनसेचे कार्यकर्ते विधानभवनात घुसतील असा इशारा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सरकारला दिला.