नवी मुंबईत आज कोरोनाचे ८३ रूग्ण, २ मृत्यू
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून पुन्हा वाढत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच सोमवारचा (दि. ६ जुलै) दिवस नवी मुंबईकरांना दिलासा देणारा ठरला. कोरोना रूग्णांची आकडेवारी शंभराच्या खाली आल्याने कोरोना नियत्रंणात येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. सोमवारी नवी मुंबईत कोरोनाचे ८३ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ५१९ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ४७९ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. ४७०५ नवी मुंबईकरांनी कोरोनाची चाचणी करताना रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट स्वत:ची करवून घेतली आहे. १२ लाख ०५ हजार २६६ नवी मुंबईकरांनी आजपर्यत कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. आज सापडलेल्या नवीन ८३ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २५ रूग्ण, नेरूळ विभागात १२ रूग्ण, वाशी विभागात ६ रूग्ण, तुर्भे विभागात ७ रूग्ण, कोपरखैराणे विभागात ८ रूग्ण, घणसोली विभागात ८ रूग्ण, ऐरोली विभागात ७ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात सोमवारी कोरोना एकहॅी नवीन रूग्ण आढळला नाही. कोरोना आजारातून बरे झालेल्या ११३ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.