संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : डेल्टा, म्युकरकोसिस आदींसह पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांची टांगती तलवार नवी मुंबईकरांच्या मानगुटीवर कायम असतानाच बुधवारी, दि. ७ जुलै रोजी नवी मुंबईत १५० कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहे तर दिवसभरात कोरोनाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १३७ रूग्ण कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे.
नवी मुंबईमध्ये दिवसभरात आढळून आलेल्या १५० रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ३५, नेरूळ विभागात १८, वाशी विभागात २४, तुर्भे विभागात १५, कोपरखैराणे विभागात १९, घणसोली विभागात २३, ऐरोली विभागात १४, दिघा विभागात ०२ येथील रूग्णांचा समावेश आहे. आज कोरोनातून बरे झालेल्या १३७ रूग्णांमध्ये ७० महिला व ६७ पुरूषांचा समावेश आहे तर कोरोनाची लागण झालेल्या नव्या १५० रूग्णांमध्ये ६५ महिला व ८५ पुरूषांचा समावेश आहे. नवी मुंबईत आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ हजार १८७ जणांची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. आतापर्यत नवी मुंबईत १२ लाख १७ हजार ८९५ जणांची कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. ५ लाख ४१ हजार ४७१ जणांनी आतापर्यत आर.टी.पी.सी.आर टेस्ट करून घेतली आहे.