Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gamil.com
- ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्यामुळे घटना उजेडात
- महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे फोटो पाठवून केली कारवाईची मागणी
- वाहतुक पोलीस, महापालिका प्रशासन यांच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धुळफेक
नवी मुंबई – कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबई महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असतानाच काही वाहतुक व्यावसायिक मात्र महापालिकेचा बॅनर लावून खुलेआमपणे आपला व्यवसाय करत असल्याचे नेरूळ सेक्टर १९ ए मध्ये अग्निशमक दलाच्या समोरच प्रकार ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला आहे.
नेरूळ सेक्टर १९ ए परिसरात एक टेम्पो (एमएच ४३बीपी ८७७०) महानगरपालिकेचा ‘मूषक नियत्रंण विभाग’ परिमंडळ १ हा समोरील भागात बॅनर लावून फिरत असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या टेम्पोचा काही वेळ पाठलाग केल्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरील विरूध्द दिशेला हा टेम्पो थांबला व दुकानातून बिसलेरीच्या लहान मोठ्या बाटल्या व बाटले दुकानदारांना वितरीत होत असल्याचे व त्या दुकानातून खाली बाटले जमा करत असल्याचा प्रकार पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी पाहिला. टेम्पोतील कर्मचाऱ्यांना महापालिकेचा बॅनर लावून बिसलेरीचा व्यापार व वाहतुक करत असल्याबाबत खांडगेपाटील यांनी विचारणा केली असता त्यांनी आम्हाला काही माहिती नाही, ड्रायव्हरला विचारा असे सांगितले. ड्रायव्हरला विचारले असता, त्यांनी आम्ही सकाळी पालिकेत दोन तास मेडिसीन देतो व उर्वरित वेळेत व्यवसाय करत असल्याचे सांगितले. पत्रकार खांडगेपाटील यांनी महापालिकेत मुषक नियत्रंण विभागात कोणताही टेम्पो मेडिसीन वितरण करत नसल्याचे सांगण्यात आले. खांडगेपाटील यांनी ड्रायव्हरला मुषक नियत्रंण विभागाच्या अधिकाऱ्यांची व ठेकेदाराची नावे व मेडिसिन कोठे देत असल्याबाबत विचारणा केली असता ड्रायव्हरला काहीही उत्तरे देता आली नाहीत. पत्रकार खांडगेपाटील यांनी टेम्पोच्या क्रमाकांची, ड्रायव्हरची व टेम्पोची तसेच बिसलेरी वितरणाची छायाचित्रे त्या वेळेत तात्काळ काढून महापालिका आयुक्त अभिजित बांगर व मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांना पाठवून घडलेला प्रकार छायाचित्रासह त्यांच्या निदर्शनास आणून दिला व पालिकेचा बॅनर लावून खुलेआमपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची व टेम्पो जप्त करण्याची मागणी पत्रकार खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. पत्रकार खांडगेपाटील यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उजेडात आला असला तरी शहरात असे प्रकार मोठ्या संख्येने घडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.