संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जुलमी मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने कळंबोली शहरात मूक प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत सामील होऊन पालिकेच्या विरोधात निदर्शने केली. या प्रभात फेरीत शिवसेना नेते शिरीष घरत, विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, शिवसेना नेते रामदास शेवाळे, कॉंग्रेस नेते सुदाम पाटील, समाजवादी नेते अनिल नाईक, नगरसेवक गोपाळ भगत, शंकर म्हात्रे, रविंद्र भगत, नगरसेविका सौ. प्रज्योती म्हात्रे, सौ. सारिका भगत, सौ. कमल कदम, सौ. प्रिया भोईर, सौ. उज्वला पाटील, शेकाप महिला आघाडी सदस्या सौ. सरस्वती काथारा, सौ. स्वाती रौंधळ, काँग्रेस नेते सुभाष गायकवाड, युवा नेते विजय भोईर, विजय पाटील तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासीयांवर सत्ताधारी व पालिका प्रशासन याने जाचक मालमता कर लादल्याने रहिवासी संतप्त आहे. कोरोना काळात अनेक नागरिक बेरोजगार झाले असून आर्थिक विवंचनेत असताना देखील हा जुलमी मालमत्ता कर रहीवासिशांचे कंबारडेच मोडून टाकणारा आहे. पालिकेच्या सभागृहात ह्या जुलमी मालमत्ता कराचा ठराव सत्ताधाऱ्याने जरी आपल्या सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेतला असेल तरी हा ठराव जो पर्यंत रद्द होत नाही व नागरिकांची या जुलमी मालमत्ता करापासून सुटका होत नाही तो पर्यंत महाविकास आघाडी रहिवासियांच्या बाजूने लढत राहील.