संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात हतबल झालेल्या परिवारातील नेरूळ सेंट झेविअर्सच्या दोन मुलांच्या शिक्षणाला अडथळे येत असल्याचे पाहून सामाजिक संस्थांच्या मदतीने संबंधित मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा शुक्रवारी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी केली.
नेरुळ येथील सेंट झेव्हीयर्स शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १० वीत शिकत असलेल्या यशोदीप बनसोडे व इयत्ता ६ वीत शिकत असलेली तमिषा बनसोडे या मुलांच्या पालकांना कोरोना महामारीमुळे मुलांच्या शाळेची फी भरणे शक्य झाले नाही. त्यातच फी न भरल्यामुळे शाळेने मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्याकडे पालकांनी केल्या. यामुळे हाजी शाहनवाझ खान यांनी संबंधित दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण व काही सामाजिक संस्था उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हाजी शधाहनवाझ खान यांनी आज शाळेत जावून मुख्याध्यापकांची भेट घेतली व मुलांची फी भरणार असल्याचे पत्र देत मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित न ठेवण्याची मागणी शाळेच्या व्यवस्थापणाकडे केली.