संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवार, दि. २० जुलै रोजी साईभक्त महिला फांऊडेशनच्या वतीने भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आषाढी वारीला येताय ना’ या अभियानांतर्गत आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही भाविकांना, वारकऱ्यांना विठू रायाचे पंढरीला जावून दर्शन घेता आले नाही. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्याही दिंडीत सहभागी होता आले नाही. त्यामुळे भाविकांची विठू दर्शनाची आस, वारीची परंपरा सानपाड्यातच प्रातिनिधिक स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत साई भक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी या वारीचे नियोजन केले आहे.
सानपाडा प्रभागा ७६ मध्ये साईभक्त महिला फाउंडेशन यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त दिंडीचे नियोजन करण्यात आले असून सेक्टर २ ३ ४ व ८ या सेक्टरमधून सोशल डिस्टन्स चे पालन करून, टाळ मृदंग च्या गजरात, वारकऱ्यांच्या पताका घेऊन, महिलांनी तुळशी वृन्दावन घेऊन, कलश घेऊन, बालक पारंपारिक वेशभूषा करून दिडींत सहभागी होणार आहेत.
ओपीजी टॉवरसमोरून सकाळी ११ वाजता ही दिंडी निघणार असून दिंडीचा समारोप शिवमंदिर सेक्टर २ येथे होणार आहे. त्याच ठिकाणी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना खिचडीचे वाटप केले जाणार आहे.
सहभागी होताना वारकऱ्यांनी, रहीवाशांनी, बालकांनी आपली वेशभूषा पारंपारिक स्वरूपात करून यावे, संपूर्ण प्रभाग
सांप्रदायिक विठुरायाच्या जयघोषात भक्तिसागरात रममाण झाला पाहिजे व सानपाड्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीचा महापुर ओंसडून वाहिला पाहिजे यासाठी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक व साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी दिली. आषाढी एकादशीनिमित्त प्रभाग ७६ मधून काढण्यात येणाऱ्या या दिंडी सोहळ्यामध्ये स्थानिक रहीवाशांनी, भाविकांनी , महिलांनी व बालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केले आहे.