संदीप खांडगेपाटील : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी जास्त होत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच बुधवारी ( दि. २१ जुलै ) नवी मुंबईत कोरोनाचे ९९ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १८०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही २८१ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ३८३ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. ३९७७ नवी मुंबईकरांनी कोरोनाची चाचणी करताना रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट स्वत:ची करवून घेतली आहे. १३ लाख १३ हजार २७ नवी मुंबईकरांनी आजपर्यत कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. आज सापडलेल्या नवीन ९९ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २२ रूग्ण, नेरूळ विभागात १६ रूग्ण, वाशी विभागात १३ रूग्ण, तुर्भे विभागात १० रूग्ण, कोपरखैराणे विभागात १९ रूग्ण, घणसोली विभागात ०५ रूग्ण, ऐरोली विभागात १२, दिघा विभागात २ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या ९९ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.