संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
- महामहीम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार
- अभिजित पाटील यांची केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर झाली होती निवड
नवी मुंबई : मेड इन इंडिया आयकॉन २०२१ या नामांकित पुरस्काराचे वाटप सोहळा भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे प्रदान करण्यात आला. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी २० जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजता प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन २०२१ महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा , पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले.
गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी मारलेली उत्तुंग भरारी आणि हे सगळं करीत असताना नुकत्याच दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळं होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला. आणि आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन येथे मेड इन इंडिया आयकॉन २०२१ हा नामांकित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कोट: मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश! पण पुरस्कार मिळाल्यापासून माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघत आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघतो आहे . शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारतोय. बरेच पुरस्कार मिळाले मिळत आहेत पण यामुळे डोक्यात अजिबात हवा जाणार नाही याची शास्वती देतो. स्वतः ला अर्थवटच्या भूमिकेत पाहतो कारण परिपूर्ण होऊन संपण्याची माझी इच्छाशक्ती नाही. आणि इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे.