संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे महाविद्यालयीन, वैद्यकीय, तांत्रिक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक सहकार्य केलेले असून विद्यार्थी संघटनांची लवकरच एकत्रित बैठक आयोजित करून राज्य सरकार संबंधितांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमआयएम विद्यार्थी आघाडीला दिले.
एमआयएम विद्यार्थी आघाडीच्यावतीने राज्यात महाविद्यालयीन, वैद्यकीय, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रदेश अध्यक्ष अॅड. कुणाल खरात, महासचिव हाजी शाहनवाझ खान आणि प्रदेश सहचिटणिस रूमान रिझवी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. या भेटीमध्ये कुणाल खरात व हाजी शाहनवाझ खान यांनी कोरोना महामारीमुळे शालेय, महाविद्यालयीन वैद्यकीय, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक व शैक्षणिक समस्यांचा पाढा उदय सामंत यांच्यासमोर वाचला. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी आगामी महिन्यात सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक आयोजित करून या समस्यांचे निवारण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने विद्यार्थी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेवून सहकार्य न केल्यास एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला समस्या सोडविण्यासाठी भाग पाडू असा इशारा यावेळी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.