संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbaialive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात वरूण राजाने दाखविलेल्या रौद्र रूपामुळे तेथील रहीवाशांना पुराचा सामना करावा लागला. यामध्ये तेथील वित्त मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले, अनेकांच्या संसारोपयोगी वस्तूंचीही वाताहत झाल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले. पूरग्रस्तांना मदतीचा हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत सिवूडस भागातील शिवसैनिक शाखाप्रमुख विशाल (विकी) विचारेंच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये जावून समाजोपयोगी कार्यात व्यस्त झाले आहेत.
कोकणातील झालेल्या अतिवृष्टी मुळे महाड, खेड, चिपळूण व आसपासच्या भागात जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शिवसेना सीवूडस व शिवराज प्रतिष्ठान नवी मुंबईच्या कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठविणे सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे हे शिवसैनिक तसेच सर्व सहकारी मित्र परिवारासोबत महाड येथे पूरग्रस्तांसाठी बाटलीबंद पाण्याची पहिली खेप घेऊन गेले. तेथे गेल्यावर खऱ्या महाभयावह परिस्थितीचे दर्शन जवळून त्यांना घडले. घराघरामध्ये चिखल पसरला असून घरातील वापराचे सर्व सामान खराब झाले आहेत. भांडी सर्व खराब झाली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना शुध्द पाण्याची अंत्यत गरज आहे. त्याच बरोबर साफसफाई करण्याकरिता स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जाणे आवश्यक आहे असे शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी सांगितले.
रहीवाशांना त्या भागात शुध्द पाण्याची गरज असल्याने शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी पाण्याची पहिल्या टप्प्यात मदत केली आहे.