संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : सोमवार, दि. २६ जुलैचा दिवस नवी मुंबईकरांना दिलासा देणारा दिवस ठरला आहे. आज नवी मुंबईत ५८ कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहे तर दिवसभरात कोरोनाने १ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १३२ रूग्ण कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. आजवर नवी मुंबईत कोरोनाने १८१७ नवी मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये दिवसभरात आढळून आलेल्या ५८ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ८, नेरूळ विभागात १०, वाशी विभागात ७, तुर्भे विभागात ४, कोपरखैराणे विभागात ५, घणसोली विभागात ९, ऐरोली विभागात १४ तर दिघा विभागातील १ रूग्णांचा समावेश आहे. आज कोरोनातून बरे झालेल्या १३२ रूग्णांमध्ये ५२ महिला व ८० पुरूषांचा समावेश आहे तर कोरोनाची लागण झालेल्या नव्या ५८ रूग्णांमध्ये २५ महिला व ३३ पुरूषांचा समावेश आहे. नवी मुंबईत आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ हजार ७३२ जणांची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. आतापर्यत नवी मुंबईत १३ लाख ५१ हजार १७४ जणांची कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. ५ लाख ७४ हजार ४७४ जणांनी आतापर्यत आर.टी.पी.सी.आर टेस्ट करून घेतली आहे. आजही होम आयसोलेशनमध्ये ३१९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.