संदीप खांडगेपाटील – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ८२ व ८४ मध्ये गेल्या काही दिवसापासून होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा थांबवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.महापालिका प्रभाग ८२ व ८४ मध्ये नेरूळ सेक्टर २ आणि ४, तसेच जुईनगर नोडचा समावेश होत आहे. येथील रहीवाशांना गेल्या ७ ते ८ दिवसापासून पालिका प्रशासनाकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्या त्या भागातील गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांनी कार्यालयात येवून दूषित पाण्याविषयी तक्रारीही केल्या आहेत. कदाचित तलाव भागात पाऊस असल्याने चिखलाचे पाणी येत असावे असा समज झाल्याने सुरूवातीला २ ते ३ दिवस रहीवाशी शांत होते, तथापि त्यानंतरही ४-५ दिवस दूषित पाणी येतच असल्याने रहीवाशी भयभीत झाले आहेत. दूषित पाण्यामुळे आजाराची लागण होण्याची भीती आहे. आधीच कोरोनाच्या तणावाखाली रहीवाशी आला दिवस ढकलत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता, संबंधितांना दूषित पाण्याची समस्या दूर करून रहीवाशांना स्वच्छ पाणी मिळणेबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.