संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या विळख्यातून नवी मुंबई शहराची सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून मंगळवारी, दि. ३ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत कोरोनाचे नवे ५१ रूग्ण आढळून आले आहेत तर शहरात कोरोना महामारीने एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीमुळे आजपर्यत १८३५ नवी मुंबईकरांचा मृत्यू झालेला आहे.
मंगळवारी आढळून आलेल्या ५१ नवीन कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १२, नेरूळ विभागात ५, वाशी विभागात ८, तुर्भे विभागात १, कोपरखैराणे विभागात ४, घणसोली विभागात ८, ऐरोली विभागातील ७, दिघा विभागातील ६ रूग्णांचा समावेश आहे. आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ८२ रूग्णांना डिसचॉर्ज देण्यात आला आहे. होम आयसोलेशन अंर्तगत २६९ लोक घरी जावून कोरोनावर उपचार घेत आहेत. ६२७० जणांनी आज कोरोनाची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. ८ लाख २४ हजार ९१९ जणांनी आजवर कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. १४ लाख १४ हजार ०२५ जणांनी आजवर स्वत:ची कोव्हिड १९ची चाचणी करून घेतलेली आहे.