Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पाऊसामुळे प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ४, ८ या परिसरातील रस्त्यालगतचे पदपथ निसरडे झाले असून काही ठिकाणी शेवाळही साचलेले दिसून येत आहे. पदपथावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक. महिला, मुले पदपथावरून चालताना घसरून पडण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. तोच प्रकार गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही घडू लागला आहे. कंडोनिअमअंर्तगत कामे करताना महापालिका प्रशासनाने सिडको सोसायटी आवारात जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्याही बदली करून दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पदपथावरून चालताना तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात चालताना घसरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसरातील पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी करून रहीवाशांना दिलासा द्यावा. यासंदर्भात २९ जुन २०२१ आणि १ जुलै २०२१ तसेच १९ जुलै २०२१ रोजी निवेदन सादर केले व आपण ते मेलवरील निवेदन तात्काळ संबंधितांना फॉरवर्डही केले. तथापि आजतागायत पालिका प्रशासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्याने आपणास ब्लिचिंग पावडरविषयी चौथे निवेदन सादर करत आहोत. संततधार पाऊसाने पदपथ निसरडे झाले असून शेवाळही साचण्यास सुरूवात झालेली आहे. लहान मुले, महिला, पुरूष व ज्येष्ठ नागरिक शेवाळ झालेल्या निसरड्या पदपथावरून घसरून त्यांना गंभीर दुखापती झाल्यावरच महापालिका ब्लिचिंग पावडरची फवारणी करणार आहे काय? असा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशी उघडपणे विचारू लागल्याने समस्येचे गांभीर्य जाणून तात्काळ कार्यवाहीबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
रहीवाशी पदपथावरील शेवाळाबाबत निर्माण झालेल्या समस्येबाबत आमच्याकडे तक्रारी करत असल्याने आम्ही आपणाकडे पाठपुरावा करत आहोत. तुम्ही दखल घेत नसले तरी आमचा पाठपुरावा कायम राहणार असल्याचा निर्धार यावेळी पांडुरंग आमले यांनी निवेदनाच्या अखेरिस व्यक्त केला आहे.