नवी मुंबई : मुसळधार पर्जन्यवृष्टीचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाला फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांना मदतीचा हातभार लावण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई भाजयुमोने महाड, पोलादपुर, चिपळूणला मदत केली आहे.
भाजप युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने महाड, पोलादपूर येथील साखर गावातील सुतारवाडी, पेठेवाडी, चव्हाणवाडी, देऊळकोंड येथे त्याचप्रमाणे चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसर, तसेच खर्डी, गोवळकोट येथे तसेच भाजपाच्या वतीने चिपळूण शहरात सुरू असलेले मदत सहाय्यता केंद्र येथे किराणा किट साहित्य, १२ बॉटलचा पाणी बॉक्स, चटई चादर, या स्वरूपाचे संपुर्ण एक किट अशा पद्धतीचे वाटप करण्यात आले. एकूण ७५० कुटूंबापर्यत हे साहित्य पोहोचविण्यात आले. सदरची सामुग्री लोकसहभागातून जमा झालेली तसेच युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांनी स्वखर्चातुन जमा केली होती.
२ व ३ ऑगस्ट हे दोन दिवस युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्यासोबत महामंत्री रणजित नाईक, जिल्हा सचिव, सुनिल किंद्रे, नरेंद्र जुराणी, सलील गवळी, मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक, माझा मोरया फाऊंडेशनचे रोहन पाटील, पंकज पाचपुते. समाजसेवक सुभाष पार्टे, विष्णू पवार, हॅप्पी सिंग यांनी महाड, पोलादपूर, चिपळूण ह्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे वाटप केले.