संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारी अजूनही नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात आपले प्रभावीपणे अस्तित्व दाखवत असून गुरूवारी (दि. ५ ऑगस्ट) नवी मुंबईत कोरोनाचे ५९ नवीन रूग्ण आढळून आले आहेत, तर कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १८४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या ६० जणांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागातील ११, नेरूळ विभागातील २२, वाशी विभागातील २, तुर्भे विभागातील ९, कोपरखैराणे विभागातील ३, घणसोली विभागातील ५, ऐरोली विभागातील ५, दिघा विभागातील २ रूग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत आजवर १४ लाख ३० हजार ८५४ लोकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. ५ लाख ९२ हजार ९५० जणांनी आजवर आर.टि.पी.सी.आर चाचणी करून घेतलेली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड रूग्णालयात आजही २५२ नवी मुंबईकर कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये २३५ जण उपचार घेत आहेत. ८ लाख ३७ हजार ८३४ जणांनी आजवर रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे.