सुरेंद्र सरोज : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिमेंटच्या जंगलाने वसलेल्या नवी मुंबई शहराला एक सांस्कृतिक चेहरा व ओळख निर्माण करून देण्याचे काम अनेक जण आपल्या कार्याने करत असतात. त्याच पठडीतील कार्य शिवसेनेचे शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख तसेच प्रभाग ८६चे शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले हे सातत्याने करत असून सोमवार, दि. ९ ऑगस्ट रोजी श्रावण मासारंभानिमित्त त्यांनी शिवभक्तांना तुळशीच्या रोपांसह फळाचे वाटप केले.
नेरूळ सेक्टर ६ येथील शिववाहतुक सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिलीप आमले हे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व शनिवारी भाविकांना फळांचे तसेच तुळशीच्या रोपांचे वाटप करत असतात. याही वर्षी कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी भाविकांच्या आग्रहास्तव आपल्या कार्यात सातत्य ठेवले.
फळवाटप व तुळशीची रोपे वाटण्याच्या कार्यक्रमप्रसंगी दिलीप आमले यांच्यासह समाजसेविका सौ. संगिता दिलीप आमले, अनिल पाटील, सुनिल गाडेकर, सौ. पुजा पवार, सौ. छाया बोस, संतोष पाटील यांच्यासह शिववाहतुक सेनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शेकडो शिवभक्तांनी आमलेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपवासाच्या फराळाचा लाभ घेतला.