संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणेंची चौकशी करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
सुभाष सोनवणेंच्या कार्यकाळामध्ये नेरूळ विभागामध्ये स्थापत्य विभागामार्फत झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी विजय माने यांनी केली आहे. नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारी कामे सोडून त्यांनी दुसऱ्याच कामांना प्राधान्य दिले असल्याचा आरोप करत विजय माने यांनी कामांच्या चौकशीची मागणी केली आहे.
नेरूळ विभागात अनेक कामामध्ये गेल्या काही काळात गलथान प्रकार झालेला आहे. कागदावर मंजुर झालेली कामे व वास्तवात झालेली कामे यात कमालीचा विरोधाभास आहे. त्यात सोनवणेंनी त्रयस्थ कंपनीने पाहणी केली असल्याचे लेखी सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. विकासकामांच्या माध्यमातून ठेकेदारांनी केलेल्या मनमानी कारभाराला पांघरूण घातले जात असल्याचे नेरूळवासियांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे शहरप्रमुख विजय माने यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीमुळे विकासकामांतील अनेक गलथान प्रकार उजेडात येणार असल्याचा आशावाद शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.