Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ नोड येथील प्रभाग ९६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करण्याची लेखी मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर सेक्टर १६, १६ ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून प्रभागात अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्या तुंबल्यांच्या व दुर्गंधी येत असल्याबाबत अनेक रहीवाशांनी तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. युध्दपातळीवर प्रभागात मल:निस्सारण वाहिन्यांचा चोकअप काढण्याविषयी अभियान राबवावे. रस्त्यावरील तसेच अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झाल्यास गृहनिर्माण सोसायटीतील मल:निस्सारण वाहिन्या तुंबणार नाहीत व रहीवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. समस्येचे गांभीर्य व आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता संबंधितांना प्रभागामध्ये मल:निस्सारण वाहिन्यांच्या सफाईबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.