नवी मुंबई : भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. ७६ आणि साईभक्त सेवा मंडळ, सानपाडा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी ७५व्या वर्धापनदिनानिमित्ताने विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता १ ते ४ वी विद्यार्थ्याकरिता चित्रकला स्पर्धा, इयत्ता ५ ते ७ वी विद्यार्थ्याकरिता निबंध स्पर्धा, इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता वक्तृत्व स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस, भारतीय झेंडा, माझा आवडता नेता हे स्पर्धेचे विषय आहेत. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या ३ विजेत्यांना पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी आणि भेटवस्तू देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला एक प्रशस्तीपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या सर्व स्पर्धा या ऑनलाईन स्वरूपात होणार असून प्रवेश प्रक्रिया करताना स्पर्धकाने काढलेले चित्र, लिहिलेला निबंध (फोटो अथवा type करून), वक्तृत्वाचा video, त्याने किंवा त्याच्या पालकांनी Facebook वर अपलोड करावा. अपलोड करताना Pandurang Vitthal Amale ह्यांना tag करावे आणि खाली दिलेले #tag वापरायचे. #happyindependenceday #pandurangamle #ward76 #sanpada
या स्पर्धेचे आयोजन समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले यांनी केले असून प्रभागातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन आमले यांनी केले आहे.