स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.coom – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : वाशीतील फोर्टीस रूग्णालयात पालिकेचा कोटा पूर्ववत करण्याची लेखी मागणी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
वाशीतील फोर्टीस रूग्णालयात महापालिका कोट्यातून १५ बेड उपलब्ध होत होते. त्यामुळे गरीब व गरजू रूग्णांना उच्चत्तम दर्जाची रूग्णालयीन सेवा उपलब्ध होत होती. सध्या पालिका कोट्यातून फोर्टीस रूग्णालय जेमतेम ७ बेडच उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे गरीब रूग्णांना फोर्टीज रूग्णालयात उपचार मिळणे सध्या अवघड होवून बसले आहे. सध्या मी माझ्या प्रभागातील सौ. सुनिता जिनपाल पाटील या महिलेला उपचारासाठी पालिका कोट्यातून फोर्टीस रूग्णालयात गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत असून हा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधित महिलेला मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या वाहनाने धडक देवून गंभीर जखमी केले आहे. पालिका प्रशासनाकडे फोर्टीजकडून असलेला कोटा कमी होणे गंभीर बाब आहे. त्यामुळे गरीब रूग्णांना उपचार मिळताना अडथळे निर्माण होत आहे. आपण कमी झालेल्या कोट्याची प्रशासकीय पातळीवर चौकशी करावी. फोर्टीज रूग्णालयातून कमी झालेला कोटा ही धक्कादायक बाब आहे. लवकरात लवकर चौकशी करून कोटा पूर्ववत करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.