नवी मुंबई : देशाच्या अमृतमहोत्सवी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रभाग क्र.- 84 च्या वतीने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले होते.
पी.आर.एस डायग्नेोस्टिक्स, नेरूळ यांच्या सौजन्याने व मनसे जनसंपर्क कार्र्यालय यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांकरिता माफक दरात (50% सूट) रक्त तपासणी केंद्राचे उद्घाटन नेरूळ-जुईनगर जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अंकुश नलावडे यांच्या हस्ते पार पडले. आरोग्य शिबिरात प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच सदर कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, महिला सेनेच्या शहराध्यक्ष डॉ. सौ. आरती धुमाळ , वाहतुक सेनेचे नितिन खानविलकर, तसेच शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अमोल इंगवले देशमुख, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, विनोद पाखरे, अक्षय भोसले, अभिलेश दंडवते, सागर विचारे, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे, मंगेश जाधव, आप्पासाहेब जाधव, शाखाध्यक्ष पुंडलिक पाटील, नरहरी कुंभार, मयूर कारंडे व समस्त महाराष्ट्र सैनिक व महिला महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.