संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी महापालिका प्रशासन अथक प्रयत्न करत असताना सोमवार, दि. १६ ऑगस्ट रोजी कोरोनाचे अवघे २६ नवे रूग्ण आढळून आले तर कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांची संख्या जेमतेम २६वर आल्याने नवी मुंबईकरांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने ‘सोनियाचा दिन’ म्हटला पाहिजे. कोरोनातून बरे झालेल्या ५६ जणांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.
आजच्या २६ कोरोना नवीन रूग्णामध्ये बेलापुर विभागातील ६, नेरूळ विभागातील ३, वाशी विभागातील ६, कोपरखैराणे विभागातील २, घणसोली विभागातील २, ऐरोली विभागातील ४, दिघा विभागातील ३ रूग्णांचा समावेश आहे. तुर्भे विभागात आज कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. नवी मुंबईत आजवर १८६४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाशीतील सिडको एक्झिबिशन कोव्हिड सेंटरमध्ये २११ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून २३० जण होम आयसोलेशनमध्ये कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. नवी मुंबईत आज ४४२३ जणांनी स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करवून घेतली आहे. १५ लाख १६ हजार ५०९ जणांनी कोरोना चाचणी स्वत:ची करून घेतलेली आहे. ९ लाख १ हजार ७९४ जणांनी आजवर रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. ६ लाख १४ हजार ७१५ जणांनी स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे. आज कोरोनाच्या आकडेवारीत जेमतेम २६ नवीन रूग्ण सापडल्याने कोरोना लवकरच नियत्रंणात येणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.