मुंबई : महाराष्ट्राची कन्या स्मिता दुर्गादास घुगे यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किलीमांजरो सर करून महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल केले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्मिताने हे शिखर पार केले असून तिच्या हिमतीला दाद देत महाराष्ट्राला तिचा अभिमान आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले पुढे म्हणाले की, आफ्रिकेतील १९ हजार फुट उंचावरील किलीमांजरो शिखरावर जाऊन स्मिताने भारताचा तिरंगा झेंडा रोवला ही अभिमानास्पद कामगिरी आहे. भगवानबाबा, आईवडिलांचा आशिर्वाद, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तीने हे यश मिळवले आहे. तीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा नावलौकीक झाला आहे. स्मिता यापुढे जगातले सर्वात उंच एव्हरेस्ट शिखरही सर करून भारताचे नाव उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करुन पटोले यांनी स्मिताला शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्मिता घुगे म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकुल वातावरण, वादळी वारे, उणे २९ तापमानात हे शिखर सर केले. हा आपला पहिल्याच प्रयत्न होता तरिही किली मांजरो शिखरावर जाऊन स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत किली मांजरोवर भारताचा ७५ फुटी तिरंगा फडवला.