संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या विळख्यातून नवी मुंबईची मुक्तता होण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झालेली आहे. कोरोना रूग्णांचा आकडाही कमी होत चालल्याचा दिलासा नवी मुंबईकरांना मिळू लागला आहे. शुक्रवार, दि. २० ऑगस्ट रोजी नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचे ५१ नवे रूग्ण आढळले असून कोरोना महामारीने आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १८७५ झाली आहे.
नवी मुंबईत आजवर १५ लाख ४५ हजार १६४ जणांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली आहे. ६ लाख २७ हजार ८२२ जणांनी स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे. ९ लाख १७ हजार ३४२ जणांनी स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. ४ हजार ९७६ जणांनी आज स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये आज २०५ जण कोरोनाने ग्रस्त असल्याने स्वत:वर उपचार करून घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये १८१ जण उपचार घेत आहेत. कोरोना आजारातून मुक्त झालेल्या ८० जणांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.
आज आढळून आलेल्या नव्या ५१ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात २२, नेरूळ विभागात ४, वाशी विभागात ८, तुर्भे विभागात ३, कोपरखैराणे विभागात २, घणसोली विभागात ३, ऐरोली विभागातील ९ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात आज कोरोनाचा एकही रूग्ण नव्याने आढळून आलेला नाही.