संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भाजप प्रभाग क्रमांक ७६ , साई भक्त सेवा मंडळ . साईभक्त महिला फाउंडेशन यांच्या माध्यमातून रक्षाबंधनानिमित्त प्रभाग ७६ मधील महिलांसाठी आयोजित केलेला ‘बंधू आपल्या दारी’ हा सोहळा उत्साहात पार पडला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच आजही रेल्वे सर्वासाठी खुली नसल्याने भावाला बहीणीकडे जाण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भाऊ येणार नसल्याने बहीणीच्या चेहऱ्यावरील नाराजी दूर करण्यासाठी पांडुरंग आमले हे स्वत: प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून रक्षाबंधन करून घेण्यासाठी पांडुरंग आमले यांनी ‘बंधू आपल्या दारी’ या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले होते.
गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या काळात त्यांनी प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून जाहिररित्या रक्षाबंधन करून घेतले होते. काही दिवसापूर्वीच आषाढी वारीचे आयोजन करताना भाविकांना, वारकऱ्यांना पांडुरंग आमले यांनी परिसरातच दिंडीमध्ये सहभागी होण्याचे तसेच विठू माऊलीचे दर्शन घडविण्याचे कार्य केले होते.
ज्या बहीणींचा भाऊ कोरोना अथवा अन्य कारणास्तव बहीणीकडे येवू शकणार नाही अथवा ज्या महिलांना भाऊ नाही, त्या महिलांचे भाऊ बनण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.
प्रभागातील आदर्श, स्वस्तिक नर्मदा, संकल्प, कोहिनुर, नवरत्न, सह्याद्री, सिद्धिविनायक, प्रियांका, स्वस्तिक, सुयोग्य रेसिडेन्सी १ व २, हिमगिरी सोसायटीमध्ये रविवारी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी ‘बंधू आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला .
प्रेमाचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा स्नेहाचा सण साजरा झाला. सर्व भगिनींनी राखी रुपी धाग्याचे बंधन बांधून आपल्या बंधुरायाच्या मनगटात शक्ती देवो या शुभेच्छा या सर्व बहिणींनी दिल्या. या सोहळा आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व महिला भगिनींचे पांडुरंग आमले यांनी आभार मानले.