संपादक : संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : एकीकडे कोरोना महामारीचे आजही अस्तित्व कायम असताना तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली भीतीचे वातावरण कायम असताना मंगळवारचा दिवस (दि. २४ ऑगस्ट) नवी मुंबईकरांना दिलासा देणारा ठरला आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे अवघे ३८ नवे रूग्ण आढळून आले असून २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या ५३ जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे.
कोरोना पर्व सुरू झाल्यापासून कोरोनाने मृत्यू होण्याची संख्या आज १८८४ वर जावू पोहोचली आहे. आज आढळून आलेल्या ३८ नव्या रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ९, नेरूळ विभागात ६, वाशी विभागात ४, तुर्भे विभागात १, कोपरखैराणे विभागात १०, घणसोली विभागात ४, ऐरोली विभागात २, दिघा विभागात २ रूग्णांचा समावेश आहे. १५ लाख ६५ हजार ७७९ जणांनी आजवर नवी मुंबईत स्वत:ची कोरोना तपासणी करून घेतलेली आहे. आज ५ हजार २४४ जणांनी स्वत:ची रॅपिड अॅण्टीजन टेस्ट करून घेतली आहे. ६ लाख २९ हजार ६२१ जणांनी आजपर्यत आर.टी.पी.सी.आर टेस्ट करून घेतलेली आहे. ९ लाख ३६ हजार १५८ जणांनी स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे.
वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड रूग्णालयात १९६ जणांवर कोरोना आजारावर उपचार सुरू आहेत तर होम आयसोलेशनमध्ये १६१ जणांवर कोरोनामुळे उपचार सुरू आहेत. मंगळवारी अवघे ३८ नवे रूग्ण सापडल्याने कोरोना नियत्रंणासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे.