सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘एक दिवस माझा समाज येथील शासनकर्ती जमात असेल’ हे बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असतांना संपूर्ण भारतभर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची बांधणी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात मोठ्या जोमाने सुरू आहे. याचेच औचित्य साधून राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील रिपाईच्या केंद्रीय कार्यालयात नवी मुंबई जिल्हा कमिटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे व महिला अध्यक्षा सुनिताताई चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, नियुक्तीपत्र व शाल देऊन स्वागत करून प्रवेश देण्यात आले.
नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंद केदारे यांच्या नेतृत्वात नेरूळ, बेलापूर, कळंबोली, वाशी, घणसोली व इतर नवी मुंबई परिसरातील सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे समाजसेवक, पत्रकार व कामगार नेते यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यामध्ये नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष जगजीत सिंग सासन, मिलिंद राऊत, सरचिटणीस निवास साबळे, संघटनसचिव सुदत्त खरात व संघटक अरुण धेंडे यांची जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झाली.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई जिल्हाध्यक्ष महावीर सोनवणे, कार्यालयीन कार्याध्यक्ष तानाजी मिसाळ, नवी मुंबई संपर्कप्रमुख प्रतीक यादव, सहसचिव गौतम कांबळे, उपाध्यक्ष राजू कांबळे, अजय मोरया, शिवाजी पटेकर, अमर बनसोडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.