सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीचा उद्रेक आता गेल्या काही दिवसापासून संपुष्ठात येवू लागला आहे. महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे कोरोना महामारी आटोक्यात येत चालली असून गुरूवारी (दि. २ सप्टेंबर) नवी मुंबई शहरात कोरोनाचे ६४ नवे रूग्ण आढळले असून तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजवर नवी मुंबईत कोरोना महामारीने १९०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळून आलेल्या नव्या ६४ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १९ रूग्ण, नेरूळ विभागात ९ रूग्ण, वाशी विभागात १२ रूग्ण, तुर्भे विभागात ८ रूग्ण, कोपरखैराणे विभागात ५ रूग्ण, घणसोली विभागात ४ रूग्ण, ऐरोली विभागातील ७ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात आज एकही नव्याने रूग्ण आढळला नाही. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या ५० रूग्णांना डिसचार्ज देण्यात आला आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड रूग्णालयात १४६ जणांवर उपचार सुरू असून होम आयसोलेशनमध्ये २४५ जण उपचार घेत आहेत. १६ लाख ३० हजार ८८३ जणांनी आजवर स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. ६८३८ जणांनी आज स्वत:ची कोरोनाबाबत रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. ९ लाख ८४ हजार ४६८ जणांनी आजवर नवी मुंबईत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. शहरात आरटीपीआर टेस्ट ६ लाख ४६ हजार ४१५ जणांनी करून घेतलेली आहे. ६४५ जणांवर नवी मुंबईत कोरोनावर उपचार सुरू आहेत.