संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारी नवी मुंबई शहरात आटोक्यात येत चालली असून सोमवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी नवी मुंबईत कोरोनाचे ५१ नवे रूग्ण आढळून आले आहेत. सुखद बाब म्हणजे कोरोना महामारीने आज नवी मुंबईत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
नवी मुंबईत आजवर कोरोना महामारीने १९११ लोकांचा मृत्यू झाला असून आज नव्याने आढळून आलेल्या कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १५, नेरूळ विभागात ६, वाशी विभागात ६, तुर्भे विभागात ३, कोपरखैराणे विभागात ८, घणसोली विभागात ५, ऐरोली विभागातील ८ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. कोरोना महामारीतून बरे झाल्याने आज ७५ रूग्णांना डिसचॉर्ज देण्यात आला आहे. ६ लाख ५४ हजार २५२ जणांनी आजपर्यत नवी मुंबईत आरटीपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे. १ लाख ६६ हजार ८०८ जणांनी आजवर स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. ६०९७ जणांनी आज स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. १० लाख ६ हजार ५५६ जणांनी स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधील कोव्हिड केअर रूग्णालयात १७६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. २८९ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.