संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्याबाबतीत समान कामाला समान वेतन याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून विलंब होत असल्याने अखेरिला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी निर्णयास विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांचीच खुर्ची दालनाबाहेर नेत अनोख्या व अभिनव पध्दतीने आंदोलन केले.
नवी मुंबई महानगरपालिका कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात व कामगारांच्या वेतन वाढी संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी (मंगळवारी, दि. ७ सप्टेंबर) आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२१ रोजी नगररचना विभाग राज्यमंत्री मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच नमुंमपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. या संपूर्ण विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्यासाठी ०७ मार्च २०२१ रोजीच्या बैठकीमध्ये कामगारांच्या वेतनाच्या संदर्भातील प्रस्ताव ३० दिवसांत शासनास सादर करावा असे लेखी आदेश दिले होते. परंतु राज्यमंत्र्यांचे आणि आयुक्तांचे आदेश असताना देखील संबंधित अधिकारी कामगारांचा वेतनवाढीच्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते, या नंतर देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून या संदर्भात वेळोवळी पाठपुरावा केला जात होता. परंतु आज नितीन चव्हाण यांनी कामगारांना प्रश्नांवर दिरंगाई करून नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्याची खुर्ची दालनाच्या बाहेर नेऊन त्यांच्या कामचुकार पद्धतीचा विरोध करण्यात आला..
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रशांत सोलास्कर, जतीन धनावडे, अजय सुपेकर, स्वप्नील गाडगे, तुषार कचरे, संडीओ मोहिते, राम पुजारे, विश्वजित भोईटे, विशाल भिलारे व कामगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.