सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) नवी मुंबई शहरामध्ये कोरोनाचे नवे ५१ रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाने २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यूमुखी पडण्याची संख्या नवी मुंबई शहरात १९१४ वर जावून पोहोचली आहे.
कोरोनाच्या ५१ रूग्णांमध्ये बेलापुर विभागातील ११, नेरूळ विभागातील ९, वाशी विभागातील ६, तुर्भे विभागातील ५, कोपरखैराणे विभागातील १०, घणसोली विभागातील ४, ऐरोली विभागातील ६ रूग्णांचा समावेश आहे. दिघा विभागात आज नव्याने एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. कोरोनातून बऱ्या झालेल्या ८२ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे. १६ लाख ७६ हजार ४३३ जणांनी आजवर स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतलेली आहे. ४ हजार ९८३ जणांनी आज स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. ६ लाख ५८ हजार ३८८ जणांनी आजवर स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट करून घेतलेली आहे. १० लाख १८ हजार ४५ जणांनी आजपर्यत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतलेली आहे.