नागरिकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न
सौ. सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : ९८२००९६५७३
नवी मुंबई : दीड दिवसाप्रमाणेच पाचव्या दिवशीही २२ मुख्य विसर्जनस्थळे व १५१ कृत्रिम विसर्जनस्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामध्ये १२९८५ घरगुती आणि १२४ सार्वजनिक अशा एकूण १३१०९ श्रीगणेशमूर्तींचे तसेच १७८० गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कोव्हीड १९ च्या कालावधीत संपन्न होत असलेल्या यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवात नवी मुंबईकर नागरिकांनी शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनास अनुसरून स्वयंशिस्तीचे पालन करीत जागरूक व जबाबदार नागरिकत्वाचे सर्वच विसर्जन स्थळांवर दर्शन घडविले.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या विभागाविभागातील आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देत नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केलेच शिवाय पर्यावरणपूरक संदेशही स्वत:च्या कृतीतून दिला. नागरिकांनी मुख्य विसर्जन तलावाच्या बाजूच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पसंती दिल्याचे चित्र दीड दिवसांच्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच पाचव्या दिवशीही पहायला मिळाले. २२ पारंपारिक विसर्जन तलावांत ५३९१ घरगुती व ७१ सार्वजनिक अशा ६००२ श्रीगणेशमूर्तींचे व ४९४ गौरींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १५१ कृत्रिम तलावात ७५९४ घरगुती तसेच ५३ सार्वजनिक अशा एकूण ७६४७ श्रीमूर्तींचे व १२८६ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
पाचव्या दिवसाच्या विसर्जनामध्ये –
बेलापूर विभागात – ५ विसर्जन स्थळांवर १५३५ घरगुती व १२ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ७५ गौरी,
नेरूळ विभागात – २ विसर्जन स्थळांवर १४३४ घरगुती व ११ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ६१ गौरी,
वाशी विभागात – २ विसर्जन स्थळांवर ६४९ घरगुती व ०३ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ३७ गौरी
तुर्भे विभागात – ३ विसर्जन स्थळांवर ६६७ घरगुती व ०९ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ६९ गौरी,
कोपरखैरणे विभागात – २ विसर्जन स्थळांवर १०१ घरगुती व ०२ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ११ गौरी,
घणसोली विभागात – ४ विसर्जन स्थळांवर ३०३ घरगुती व २५ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व १३३ गौरी,
ऐरोली विभागात – ३ विसर्जन स्थळांवर ७०२ घरगुती व ०९ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व १०८ गौरी,
दिघा विभागात – १ विसर्जन स्थळांवर ० घरगुती व ० सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ०० गौरी,
अशाप्रकारे एकुण २२ विसर्जन स्थळांवर ५३९१ घरगुती व ७१ सार्वजनिक अशा एकूण ६००२ श्रीगणेशमुर्तींचे व ४९४ गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या १५१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर , बेलापूर विभागात – २१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ४२७ घरगुती व ०७ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ६९ गौरी,
नेरूळ विभागात – २७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ५९६ घरगुती व ०५ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व १२५ गौरी,
वाशी विभागात – १८ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ४५० घरगुती व ०४ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ७० गौरी,
तुर्भे विभागात – २० कृत्रिम विसर्जन स्थळांवर ५६४ घरगुती व ०९ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ५३ गौरी,
कोपरखैरणे विभागात – १६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर २५४५ घरगुती व १३ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ६०९ गौरी,
घणसोली विभागात – १७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ११८८ घरगुती व ०५ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व २२२ गौरी,
ऐरोली विभागात – २३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ११९५ घरगुती व ०७ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ८७ गौरी,
दिघा विभागात – ९ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ६२९ घरगुती व ०३ सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व ५१ गौरी,
तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण १५१ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ७५९४ घरगुती व ५३ सार्वजनिक अशा एकूण ७६४७ श्रीगणेशमुर्ती आणि १२८६ गौरींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी १२९८५ घरगुती व १२४ सार्वजनिक अशा एकूण १३१०९ श्रीगणेशमूर्तींचे व १७८० गौरींचे भक्तीपूर्ण विसर्जन संपन्न झाले. विशेष म्हणजे नागरिकांना सुलभपणे विसर्जन करता यावे यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ च्या विशेष पोर्टललाही उत्तम प्रतिसाद देत ५९५ नागरिकांनी त्यावर आपले विसर्जनसाठीचे ऑनलाईन स्लॉट बुकींग केले.
श्रीमूर्ती व गौरी विसर्जनाकरिता महानगरपालिका आठही विभाग कार्यालयांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था नियोजनबध्दरित्या कार्यरत होती. विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख होता.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळातील सात दिवसांचे तसेच अनंतचतुर्दशीदिनी होणारे दहा दिवसांचे विसर्जन याप्रसंगीही अशाच प्रकारे नियोजन करण्यात आलेले असून विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.