संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २३मधील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर करावे यासाठी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा कायम ठेवत समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी मुंबईत पाण्याच्या टाकीची (जलकुंभाचा) सुरक्षा हा विषय ऐरणीवर आलेला आहे. पाण्याच्या टाक्या या सिडकोकालीन असल्याने त्यांचा पुर्नविचार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. कोपरखैराणे सेक्टर २३ मध्ये आकाशगंगा सोसायटीच्या पाठीमागील बाजूस महापालिकेची पाण्याची टाकी आहे. या टाकीचे बांधकामही १९९३-९४चे आहे. आज जवळपास या टाकीच्या बांधकामाला अडीच दशकाहून अधिक कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाकीची जर दुर्घटना झाली तर बाजूच्या निवासी परिसराला त्याची किंमत मोजावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात पाण्याच्या टाकीबाबत घडलेल्या घटना पाहता कोपरखैराणे सेक्टर २३ मधील पाण्याच्या टाकीची बांधकामाची सुरक्षा जाणून घेण्यासाठी संबंधितांना या पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. १९ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांना निवेदन सादर करताना पाण्याच्या टाकीच्या (जलकुंभ) स्ट्रक्चरल ऑडिटविषयी आग्रही मागणी केली आहे.
२६ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. समस्येचे निवारण सुटेपर्यत सुनिता देविदास हांडेपाटील विविध विषयावर पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत असल्याने तसेच पालिका आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटीगाठी घेत आहे. विशेष म्हणजे समस्यांचा पाठपुरावा करत असताना कोठेही फोटोसेशन तसेच चमकेशगिरी सुनिता देविदास हांडेपाटील करत नसल्याने प्रभागाला वै. देविदास हांडेपाटील यांच्यानंतर सुनिता हांडेपाटील यांच्या रूपाने सक्षम वारसा लाभला असल्याचा आशावाद कोपरखैराणे सेक्टर २२,२३,१६,१७ मधील रहीवाशांकडून उघडपणे व्यक्त केला जावू लागला आहे.