संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
बातमीसाठी संपर्क : Navimumbailiive.com@gmail.com
रवींद्र सावंतमुळे कामगारांना दोन वर्षाचा थकीत वेतनाचा फरक थेट बॅक खात्यात जमा
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील ज्या ज्या खात्यातील कर्मचारी इंटक या कामगार संघटनेशी संलग्न झाले, त्या त्या खात्यातील कामगारांना अल्पावधीतच न्याय मिळाल्याची अनेक उदाहरणे नवी मुंबईच्या कामगार विश्वाने जवळून पाहिली आहेत. अनुभवली आहेत. कामगारांच्या कायम सेवेचा प्रश्न असो अथवा कंत्राटी कामगारांच्या समान कामाला समान वेतन हा विषय असो. इंटकच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाला यासंदर्भातले प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावे लागले आहे. कोपरखैराणे मल:निस्सारण केंद्रातील कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीतील फरकाच्या रकमेचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित होता. या कामगारांनी इंटकचे सदस्यत्व स्विकारल्याच्या घटनेला १५ दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच मल:निस्सारणच्या कामगारांच्या बॅक खात्यात वेतनवाढीतील फरकाची रक्कम महापालिका प्रशासनाकडून जमा करण्यात आली आहे. इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्याला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरखैराणेतील मल:निस्सारण केंद्रातील कामगारांच्या वेतनवाढीतील फरकाच्या रकमेचा विषय महापालिका प्रशासनात गेल्या २ वर्षापासून रेंगाळतच होता. कामगारांनी सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. याच कालावधीत इंटक कामगार संघटनेच्या माध्यमातून इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत कामगारांच्या समस्या निवारणासाठी करत असलेला पाठपुरावा, कामगारांच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडे गेलेले मंजुरीसाठी गेलेले प्रस्ताव यामुळे कोपरखैराणेतील मल:निस्सारण केंद्रातील कामगार रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाकडे आकर्षिले गेले व त्यांनी इंटकचे सदस्यत्व स्विकारले. रवींद्र सावंत यांनी मल:निस्सारण केंद्रातील कामगारांच्या वेतनवाढीतील फरकाच्या रकमेचा प्रश्न कामगार प्रतिनिधी राजू जाधव, राहूल पाटील, प्रतिक तांडेल या कामगार प्रतिनिधींनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी १५ दिवसाच्या कालावधीत आयुक्त अभिजित बांगर व संबंधित उपायुक्तांकडे भेटीगाठी घेत संबंधित समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मल:निस्सारण केंद्रातील कामगारांच्या बॅक खात्यात २७ हजार ५०० रूपये फरकाची रक्कम जमा झाल्याने संबंधित कामगारांकडून आनंद व्यक्त केला जात असून कामगार नेते रवींद्र सावंत यांच्यामुळेच आमची समस्या मार्गी लागल्याची प्रतिक्रिया संबंधित कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कामगारांच्या समस्या सोडविणे व त्यांना सुविधा मिळवून देणे हेच आपले ध्येय असून कामगारांना सुखी ठेवण्यासाठीच प्रशासनदरबारी पाठपुरावा करत असतो. कामगारांच्या समस्या प्र्रशासनाने समजावून घेवून त्यातील गांभीर्य जाणल्यास समस्या सुटण्यास विलंब लागत नसतो. ही समस्या सोडविण्यास प्रशासनाने जी तत्परता दाखविली, तशीच तत्परता प्रशासन कामगारांच्या अन्य समस्या सोडविण्यास दाखवेल,असा आशावाद व्यक्त करत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.