नवी मुंबई : स्वाती इंगवले
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
एकीकडे महापालिका प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून सतत कागदी घोडे नाचवूनही धुरीकरण होत नसल्याने व दुसरीकडे परिसरात डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे रूग्ण आढळू लागल्यावर सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी शुक्रवार, शनिवार, रविवार असे सलग तीन दिवस स्वखर्चाने धुरीकरण करत परिसरातील रहीवाशांना दिलासा दिला आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजाराचा उद्रेक होत असल्याने रहीवाशांच्या आरोग्य रक्षणासाठी प्रभाग ७६ मध्ये सातत्याने धुरीकरण करण्यात यावे यासाठी भाजपाचे प्रभाग ७६ मधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे सातत्याने लेखी निवेदनेही दिली होती. आयुक्तांकडून प्रभाग ७६ मध्ये धुरीकरण व्हावे यासाठी संबंधितांना ती निवेदने तात्काळ फॉरवर्डही करण्यात आली. परंतु आयुक्तांच्या फॉरडर्व झालेल्या निवेदनांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.पालिका प्रशासनाची धुरीकरणाबाबत उदासिनता व प्रभागात डेंग्यू-मलेरियाचे रूग्ण आढळू लागल्यावर स्वखर्चाने परिसरात धुरीकरण करण्याचा निर्णय भाजपच्या पांडुरंग आमले यांनी घेतला. परिसरातील डास निर्मूलनासाठी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व रहीवाशांच्या मदतीने शुक्रवार, शनिवार, रविवार असे सलग तीन दिवस प्रभागात धुरीकरणाची मोहीम राबविली.
आदर्श, संकल्प, कोहिनूर, सिध्दीविनायक, सह्याद्री, नवरत्न, प्रियंका, स्वस्तिक, साईसागर, छाया, ड्रीमलॅण्ड, गीतांजली, नटराज, वृंदावन या गृहनिर्माण सोसायट्याच्या बाहेरील व अंर्तगत भागात रहीवाशी सांगतील त्या त्या ठिकाणी पांडुरंग आमले यांच्याकडून धुरीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात पांडुरंग आमले यांच्यासमवेत भाजपा पदाधिकारी आज्ञा गवाने, रमेश शेटे, प्रथमेश माने, विनायक काबुगडे, आशिष चौधरी, मनोज धुमाळ, सिध्देश आमले, अथर्व आमले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.
पालिका प्रशासन धुरीकरणाबाबत उदासिनता दाखवित असले तरी प्रभागात स्थानिक रहीवाशांची साथीच्या आजाराच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी आम्ही भाजपच्या वतीने हे धुरीकरण अभियान राबविले अशी माहिती पांडुरंग आमले यांनी यावेळी दिली.