नवी मुंबई – स्वाती इंगवले
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmai.com
नवी मुंबई : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देवून आपले काम संपत नाही. त्यांचे पुढील शिक्षण, त्यांचा रोजगार-व्यवसाय, ते स्थिरस्थावर होईपर्यत आपण त्यांची सोबत केली पाहिजे. या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी २४ तास उपलब्ध असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव भगत यांनी दिली.
नेरुळ येथे एनआरबी एज्युकेशनल, सोशल अँड कल्चरल ट्रस्ट तर्फे इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना विविध संकटांना समस्यांना तोंड द्यावे लागले. अद्यापही बरेच जण त्यातून सावरलेले नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले शिक्षण न थांबता विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केले. या विद्यार्थ्यांची बॉर्डाच्या माध्यमातून परीक्षा घेतली गेली नव्हती त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्याऐवजी त्यांना उपहासाला सामोरे जावे लागले अशावेळी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकी चा हात देऊन त्यांना आणखी प्रगती करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
एनआरबी एज्युकेशनल, सोशल अँड कल्चरल ट्रस्ट संचालित एन आर भगत सीनियर आणि ज्युनियर कॉलेज (आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स) , एन आर भगत इंग्लिश स्कूल आणि शिक्षण प्रसारक विद्यालय यांच्या माध्यमातून मराठी आणि इंग्लिश माध्यमाची शाळा त्याचप्रमाणे जूनियर आणि सीनियर कॉलेज कमी फी मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोरोना महामारी च्या काळात देखील अनेक शैक्षणिक संस्थांनी आपल्या मध्ये वाढ केलेली असताना एनआरबी एज्युकेशनल, सोशल अँड कल्चरल ट्रस्ट मात्र अपवाद आहे विद्यार्थ्यांची फी न वाढवता उलट या संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात २० टक्के कपात केली आहे.संस्थेने दिलेल्या या सवलतीचा फायदा परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री नामदेव भगत यांनी यावेळी केले. अनेक पालक अजूनही लॉक डाऊन मुळे उद्भवलेल्या आर्थिक कोंडीतून अजूनही सावरलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांना सहकार्याच्या हेतूने गरजू विद्यार्थ्यांना रुपये १०००/- मात्र भरून आपला प्रवेश निश्चित करण्याची सुविधा संस्थेने दिली आहे. उरलेले शुल्क वर्षभरात सुलभ ४ हफ्त्यात भरण्याची सुविधा संस्थेने करून दिली आहे.
या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास एन आर बी ट्रस्टचे खजिनदार अशोक पाटील, कॉलेजच्या प्राचार्य सौ पौर्णिमा, मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कोठेकर, सौ वंदना पाटील, श्रीमती भुवनेश्वरी राजशेखर, प्रदीप खिस्ते, श्रीमती नसीम शरीफ आदी उपस्थित होते.
कोरोना नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या या कौतुक सोहळ्यास नेरुळ परिसरातील अनेक विद्यार्थी यावेळी या सत्कार समारंभास उपस्थित होते.