नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 6 मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जीमच्या वर शेड बसविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर 6 परिसरात नवी मुंबई महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ओपन जीमचे निर्माण करण्यात आले आहे. तथापि पावसाळ्यात चार महिने पावसामुळे स्थानिक रहीवाशांना ओपन जीमचा वापर करता येत नाही. तसेच उन्हाळ्यात सांयकाळी साडेपाच सहापर्यत उन्हामुळे ओपन जीममध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही. कडक उन तसेच मुसळधार पाऊस यामुळे जवळपास सात ते आठ महिने रहीवाशांना ओपन जीमचा वापर करता येत नाही. याशिवाय पाऊस, उनामुळे ओपन जीमच्या साहीत्याचेही होणारे नुकसान आणि रहीवाशांच्या वापरास येणारे नैसर्गिक अडथळे पाहता महापालिका प्रशासनाने ओपन जीमच्या वर पत्र्याचे शेड बसवावे. यामुळे ओपन जीमच्या साहित्याचे नुकसान होणार नाही. तसेच पावसाळा असो वा उन्हाळा. शेड बसविल्याने रहीवाशांना ओपन जीममध्ये व्यायाम करणे शक्य होईल. समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहीवाशांकडून होत असलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करून ओपन जीमवर शक्य तितक्या लवकर पत्र्याचे शेड बसविण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.