स्वयंम पीआर एजंन्सी : स्वाती इंगवले
बातमीसाठी संपर्क : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)
नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीतील ठाणे जिल्हा लोकसभा समन्वय समिती सदस्य व धनगर नेते ॲड. हनमंत वाक्षे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते तसेच नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष मिलिंद केदारे, मुंबई जिल्हाध्यक्ष महावीर सोनवणे व कार्यालयीन सचिव मिसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश घेतला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आंबेडकरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात रिपाई पक्षाची संपूर्ण भारतभर मोठ्या जोमाने बांधणी चालू असून इतर राजकीय पक्षामधील मोठमोठे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश घेत आहेत, त्यामुळे विरोधकांच्या उरामध्ये धडकी भरली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपाई पक्ष हा एक मोठा पर्याय मतदारांसाठी खुला असणार आहे.
हनमंत वाक्षे यांनी आपले मनोगतात व्यक्त केले की, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी बहुजन वर्गातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने स्वच्छेने तयार आहेत आणि याचेच औचित्य म्हणजे महाराष्ट्रभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला व पसंतीला मान देऊन दीपक भाऊंच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात काम करण्याची संधी मिळाली हे मोठे सौभाग्य. पक्षाचा प्रसार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मोठ्या मेहनतीने कसोशीने प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
तसेच नवी मुंबईतील विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे समाजसेवक, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते यांचाही जाहीर पक्ष प्रवेश यावेळी करण्यात आला यामध्ये
अमोल जावळे (ऐरोली विधानसभा अध्यक्ष), विवेक बनसोडे (बेलापूर विधानसभा अध्यक्ष), रंजीत सोनवणे (बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष), आदित्य घोडेस्वार (ऐरोली विधानसभा संपर्कप्रमुख), गौतम लांडगे (ऐरोली विधानसभा सचिव), सुनील आव्हाड (बेलापूर विधानसभा संपर्क प्रमुख), ओमकार सुखदेव (बेलापूर विधानसभा सचिव), तुकाराम कटाळे (तुर्भे विभाग अध्यक्ष) यांची नवी मुंबई जिल्ह्याच्या महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करतांना म्हटले की, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पक्ष प्रवेश करण्याची तयारी आहे व त्यांना योग्य वेळी पक्ष प्रवेश दिला जाईल. बाबासाहेबांचे चळवळीचे रथ पुढे घेऊन जात असतांना व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन तन-मन-धनाने काम करून ती आपली स्वतःची जबाबदारी आहे अशा भावनेने काम करणे अत्यावश्यक आहे. भविष्यात रिपाई पक्ष सत्तेत येऊन येथील कष्टकरी- गोरगरीब सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज बनेल या दृष्टीने संपूर्ण भारत भर आखणी व बांधणी चालू आहे. तसेच यावेळी दीपकभाऊंनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुदत्त खरात, प्रतीक यादव, राजू कांबळे, मिलिंद राऊत, योगेश गोरे, निवास साबळे, संतोष चव्हाण, नंदू कांबळे, शिवाजी पटेकर, धनराज सूर्यवंशी, गौतम कांबळे इत्यादी नवी मुंबई जिल्हा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.